नरेंद्र सिंदकरांचे प्रतिज्ञापत्र आणि नेताजी सुभाषचंद्रांचा शोध
इतर बातम्यांच्या गोंधळात एका बातमीकडे उशिरा लक्ष गेल, गेल्या वर्षाभरात पश्चिम बंगाल सरकार आणि भारत सरकारनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी बर्याच गोपनीय फाईल्स टप्प्या टप्प्याने खुल्या केल्या. सुरवातीस या फाईलींबद्दल जराशी उत्सुकता होती म्हणून चाळून पाहील्या गेल्या, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या नातेवाईकांवर कशी पाळत ठेवली गेली या पलिकडे फारसे काही त्यातून निष्पन्न झाले नाही कारण सर्वात गोपनीय जी काही फाईल असेल ती इंदीराजींच्याच काळात नष्ट केली गेली. नाही म्हणावयास नंतरच्या फायली उघडण्याच्या बातम्यांकडे आताशा दुर्लक्षही होऊ लागले.
मिसळपाव