Skip to main content

नौदल

विशाखापट्टणम’ : अत्याधुनिक आणि शक्तिशाली

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 20/11/2021 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे. भारताने आपल्या नौदलाची त्रिमितीय शक्ती वाढवण्यासाठी 1990च्या दशकापासूनच विविध प्रकल्प हाती घेतले. ‘प्रोजेक्ट-15 बी’ असाच एक प्रकल्प.

समुद्रावरची हवाई शक्ती

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 13/11/2021 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय हवाईदलाने 2021 मध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलांबरोबर हिंदी महासागरात पार पडलेल्या संयुक्त युद्धसरावांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.