मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती

माहितगार ·

पॉइंट ब्लँक 30/03/2016 - 14:51
अब आया उट पहाड के निचे. आधी विज्ञान विज्ञान करत धर्माचा द्वेष करायचा. आणि विज्ञानानं चपराक ( मिपावर फाट्यावार मारणे असं काही तरी म्ह्णतात) दिली मग "धर्मात स्थान" वगैरे गप्पा मारयाच्या.
नास्तीकांना मनोविकृत ठरवण्याची स्पर्धा लागल्याचे एका हिंदूधर्मावलंबी मिपाचर्चा धाग्यावर
डोक्याचं माहिती नाही पण डोळ्यात दोष नक्कीच आहे. एक स्पर्धा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप. एका वैज्ञानिक जरनल मध्ये प्रसिद्ध झालेले शास्र्तोक्त अभ्यासाचे निष्कर्ष दिले आहेत. नास्तिकांच वि़ज्ञानावर प्रेम नाही हे तुम्ही परत एकदा सिद्ध केलतं. त्या धाग्यात हिंदू हा शब्द एकदाही आलेला नाही. तुम्हाला तसा भास होण्याचे कारण काय असावे बर? ;) असो हिंदू धर्माची दोन सोपी तत्वे आहेत १. दुसर्यांच्या मताचा आदर तोपर्यंत करा जोपर्यंत ते तुमच्या मताचा आदर करतात २. धर्माच्या नावाने उगाचा कुणी शिमगा करत असेल तर त्याला बदडून ( हातापायी करायची गरज नाही. तर्कनिष्ट वाद करून ही बदडता येते) काढा. बघा कुठं बसता येतयं का तुम्हाला ह्या दोन तत्वांच्यामध्ये. हुडका स्वतःच स्थान. उगाचा लोकांना प्रश्न विचारून तुम्हाला स्थान मिळणार नाही.

In reply to by पॉइंट ब्लँक

आनन्दा 04/04/2016 - 14:09
प्रोब्लेम असा झालाय की तुम्ही तुमच्या धाग्यात नास्तिक, बुद्धीवादी आणि अज्ञेयवादी या तिघांनाही एकाच तागडीत तोललेय. त्यामुळे बर्‍याच लोकांच्या शेपटाव्र पाय पडलाय. नास्तिक, अज्ञेयवादी आणि बुद्धीवादी या तीन वेगळ्या जाती आहेत. आणि तुम्ही जे निष्कर्ष मांडलेत ते मिथ्याबुद्धीवाद्यांना लागू होतात.. त्यामुळे प्रामाणिक लोक रागावणे साहजिक आहे. असो.

In reply to by पॉइंट ब्लँक

माहितगार 09/04/2016 - 23:29
शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. या दुसर्‍या धाग्यावरील चर्चा प्रतिसादास उत्तरे देताना मी आस्तीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी प्रतिवाद केलेला दिसेल. तिथे मी खालील प्रमाणे उत्तर दिले आहे तेच बहुधा इथेही असेल.
एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा 'आपला' नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे. बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते हे खरे नाही का ?

lgodbole 04/04/2016 - 18:21
नास्तिक झाले तरी कडुलिंबाच्या काडीने दात घासता येतात. मोदक खाता येतात... दिवाळीची सुट्टी घेता येते.

चौकटराजा 04/04/2016 - 19:25
प्रथम मी नास्तिक आहे म्हणजे काय याची भूमिका स्प्ष्ट करतो.. नास्तिक म्हणजे कोणी विश्व हेतूपूर्वक चालवतो. तो त्रयस्थ असून त्याला निर्णय करण्याची मुभा॑ असून तो काहीतरीच्या बदल्यात विश्वातील एखाद्या घटकाची परिस्थीति बदलतो असे न मानणारा" . म्हणजेज काय मानणारा तर हे विश्व परस्परावलंबी व परस्परांवर परिंणाम घडवून आणणार्या घटकांचे बनले आहे .त्यातील सर्वच घटकांचे सामर्थ्य सारखे नाही तरीही आपल्या सामर्थ्याच्या परिघात सर्वच घट्क एकमेकाना काही तरी करीत असतात. वरील आमच्या संकल्पना म्हण्जे आम्हाला विश्वाचे पूर्ण ज्ञान झाले असा दावा नाही पण सत्याच्या दिशेत पडलेले ते पहिले वहिले पाउल ही असू शकेल. आम्हाला अस्तिकांच्या कोणत्याही शिफारसीची गरज नाही व त्यांच्या आमच्या विषयीच्या असल्याचे तर कलुषित द्रुष्टीकोनाला आपण फाट्यावर मारतो.

In reply to by चौकटराजा

अ-मॅन 12/04/2016 - 09:37
आम्हाला अस्तिकांच्या कोणत्याही शिफारसीची गरज नाही असे म्हणने म्हणजे पोपने, "आमच्या सिध्दांताना विज्ञानाच्या समर्थनाची गरज नाही त्यांच्या आमच्या विषयीच्या असल्याचे तर कलुषित द्रुष्टीकोनाला आपण फाट्यावर मारतो" असे म्हणने होय. मग काय पोप नास्तिक झाला काय ? नास्तिकता अशी जर तर वर तुम्ही कशी काय अवलंबुन ठेवता ? हे तर निव्वळ स्वतःभोवतीचे आखलेले रिंगण झाले जे आस्तिक अंध्श्रध्दाळु देखील स्वतःभोवती आखतात मग तुमच्या अन त्यांच्या कृतीत फरक काय ते स्पश्ट कराल काय ?

In reply to by अ-मॅन

अ-मॅन 12/04/2016 - 09:43
माझा वरील प्रतिसाद सुलभ आकलन न होणे आपणास शक्य आहे, म्हणून सोप्या शब्दात बोलायचे तर ज्या क्षणी तुम्ही एखादी गोष्ट मानता पण ती तसेच असेलच याबद्दल ठामपणा व्यक्त करत नाही तेंवबनतोते निव्वळ धारणा वा श्रध्दा ठरते उदा. तुमचे वरील मानणे सत्याच्या दिशेने पहिले पाउल असेल, आहेच असे न्हवे. म्हणून तौलनीक द्रुश्ट्या आपण व पोपनाण्यामाळेचे मणी ठरत आहात हे आपणास लक्षात आले काय ? परीणामी एकप्रकारे आपण स्वतःलाच फाट्यावर मारले आहे ही बाब ध्यानात घ्यावी.

पैसा 12/04/2016 - 20:42
धर्माची व्याख्या 'धारयति इति धर्मः' कोणाच्या फार लक्षात नसते. विविध कर्मकांड म्हणजे बहुतांश परंपरेतून चालत आलेली संस्कृती, तिचे अनेक घटक असू शकतात. मात्र बहुसंख्य लोक संस्कृती आणि धर्म यात प्रचंड गल्लत करतात. हिंदु जीवनपद्धती खरे तर अतिशय सहिष्णु आहे. चार्वाकापासून मधुराभक्तीपर्यंत इथे सगळ्यांना आपापले स्थान आहे आणि वेगळे झालेल्या बौद्ध आणि जैन विचारांनाही मत म्हणून सामावून घेण्याची ताकद आहे. पण याचा फायदा करून घ्यावा या विचाराने फार कोणी वागताना दिसत नाही. "मला वाटते तोच देव आणि तोच धर्म" असे मानणारे हिंदु लोक हिंदु जीवनपद्धतीचे रक्षण करतात की नुकसान करतात याचा सगळ्यांनी विचार करणे आवश्यक आहे.

In reply to by पैसा

बाळ सप्रे 13/04/2016 - 11:35
'धारयति इति धर्मः' किंवा हिंदु ही जीवनपद्धती आहे वगैरे व्याख्या फारच open to interpretation आहेत. सोयीस्कररीत्या तू असं म्ह्णतोस तर तू हिंदू, असं म्हणतोस तर हिंदूविरोधी वगैरे कशाही फिरवता येतात. म्हटलं तर सगळं जग हिंदू ठरतं (बाकी सगळे पंथ-- आठवतय ना?) .. जसं बर्‍याच गोष्टी नजरेआड करून "relegion of peace" म्हणता येतं तसच.. त्यामुळे कुठल्याही धर्माला अशा व्याख्या करून उगाच व्यापकता /उदात्तता देणे मला अजिबात पटत नाही. रुढार्थाने प्रत्येकाच्या देवाच्या कल्पना आणी उपासना पद्धती हीच काय ती धर्माची खरी ओळख असते..

वडापाव 13/04/2016 - 10:06
इथे नेमकी उलटी परिस्थिती आहे. आत्मविश्वास कमी असणारी माणसं तो गरजेहून जितका कमी असतो तेवढा देवावर विश्वास जास्त ठेवतात. ज्यांना देवावर विश्वास ठेवायचाय त्यांनी तो खुशाल ठेवावा. पण त्याला खुश करण्यासाठी इतरांना त्रास होईल असा काहीतरी अचाट गाढवपणा करायचा हे एक, त्याच देवावर विश्वास ठेवा म्हणून इतरांवर (यात कुटुंबीयही आले) बळजबरी करायची हे दुसरं, आणि देवाच्या नावाने इतरांना लुबाडून पैसे कमवायचे हे तिसरं अशा प्रमुख कारणांनी आस्तिकांसोबत समाजात गोडीगुलाबीने राहणं कठीण होऊन बसतं.

In reply to by वडापाव

तर्राट जोकर 13/04/2016 - 10:14
मनोविकारतज्ञांनी ठरवले तर मनुष्याची प्रत्येक भावना हा एक मनोविकार आहे असे सिद्ध करतील. ह्याविषयावरच पॉइंट ब्लँक ह्यांचा धागा येऊन गेलाय मिपावर.

महाभारतातील यक्षप्रश्नचर्चेत एकेक्षणी युधिष्ठीर धर्मविचारांमध्ये विद्वदजनांमध्ये सहमती नसल्याचे सुचवताना दिसतो (संदर्भ) आस्तीकता आणि नास्तीकता या सब्जेक्टीव्ह गोष्टी आहेत विवीध दृष्टीकोणांच्या आस्तीक आणि नास्तीकांमध्ये परस्पर वाद-विवाद होत असतात. जोपर्यंत विवाद आणि शास्त्रार्थ तर्कसुसंगत नसेल किमान सभ्यता पाळून असतात तो पर्यंत चिंतेची बाब नसावी.