Skip to main content

मत

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

नवीन थीमबाबत चर्चा

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.