Skip to main content

मिर्झापूर

मिर्झापूर २ : नो स्पॉईलर रिव्यू.

लेखक साहना यांनी मंगळवार, 27/10/2020 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉयलर साठी मराठी शब्द सुचवा. mirzapur 2 लहानपणी काही मुलांना फळांची चोरी करण्याची सवय होती. मग हि पोरें काही चोरायला बागेंत आली कि वडील ओरडत असत मग हि पोरे पळत जात असत. पण मला एक गोष्टीचे नेहमीच कुतूहल वाटत असे के वडिलांनी कधीच ह्या मुलांना पकडायचा प्रयत्न केला आणि किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना दम भरला नाही.