Skip to main content

मिपा आणि करोनाचे कल्पक मिपा बॅनर

करोना आणि मिपाचे कल्पक बॅनर !

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 23/03/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणूच्या लागणीची साथ आली, आणि आपले दैनंदिन जीवन ढवळून निघाले, अन मग मिपाकर ही या ताज्या विषयावर चर्चा करायला मागे का राहातील ? डॉ सुबोध खरे यांचा कोविड-१९ विषयीचा लेख म्हणजे शास्त्रीय माहिती, जैविक तपशील यांचा आरसाच, बऱ्याच लोकांनी तिथं चर्चा केली, शंका विचारल्या, उत्तरं मिळून प्रबोधनही झालं. कुमार१ यांचा हात, जंतू, पाणी आणि साबण हा देखील स्वच्छतेच्या अंगाने चर्चला गेलेला सुरेख लेख. संदीप चांदणे यांची मास्कमधून ही जिद्द आणि जगवणं सांगणारी कविता. ही काही वानगी दाखल उदाहरणे.