Skip to main content

मी अजिबात घाबरत नाही....

मी अजिबात घाबरत नाही....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 02/03/2016 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा धागा मुद्दाम काथ्या कुटायला काढला आहे.न घाबरणार्‍या लोकांनी, घाबरणार्‍या लोकांसाठी, न घाबरता काढलेला काथ्याकूट धागा.... हिंदी सिनेमे बघायला मी अजिबात घाबरत नाही, पण ते १९८०च्या पुर्वी असतील ह्याची मात्र खात्री करतो. मिपावर तासन-तास पडीक रहायला मी अजिबात घाबरत नाही. पण घरातली सगळी कामे करायला कुणी तरी आहे ना, ह्याची मात्र खात्री करून घेतो. बायकोच्या हातचा चहा प्यायला मी अजिबात घाबरत नाही. पण त्या चहाला आल्याचा स्वाद आहे ना, हे मात्र एक घोट घेवून बघतो. केरसूणीने झूरळ मारायला मी अजिबात घाबरत नाही, बायकोपुढे शौर्य गाजवायला तेवढाच एक चानस असतो.