Skip to main content

मदत करियर

मदत पाहिजे - हॉटेल शेफ साठी परदेशातील किंवा भारतातील संधी

Published on बुधवार, 04/01/2017
मी काही महिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती (गुलटेकडी, पुणे ) मध्ये अभ्यासिकेत शिकवायला जायचो. त्यावेळी ओमला भेटलो. त्यावेळी तो ९ वी मध्ये होता. तो मुळचा बीडचा आहे. वस्तीतून मेहनत करून १० वी ला ७०% आणि १२ वी ला ७१% मिळवून तो पास झाला. आत्ता सध्या तो हॉटेल व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमाला (AISSMS College of Hotel Management & Catering Technology, पुणे) मध्ये चौथ्या वर्षाला आहे. पहिली तिन्ही वर्ष फर्स्ट क्लास आहे त्याला. तसेच शिकत असतानाच त्याने बिबेवेवाडीच्या (पुणे) हॉटेल Regent चे (रासकर palace) किचन २ वर्ष सांभाळले आहे.