Skip to main content

मदत हवीये

कोटक बँक आणि RBS /ABN AMRO कार्ड्स

लेखक IT hamal यांनी मंगळवार, 22/08/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
८/१० दिवसापुर्वी मला कोटक बँकेचा ई-मेल आलाय.. एक एक्सेल sheet पाठवली ...ज्यात २००७-२०११ चे क्रेडिट कार्ड चे statement आहे... माझे नाव/पत्ता काहीही नाही त्या एक्सेल sheet मध्ये.. ५/६ दिवसापासून सारखे कॉल्स ही येताहेत... नाव माझेच सांगतात ( त्याच्या डेटा मध्ये माझे middle नाव नाहीये ...) आणि address ही माझाच सांगत आहेत.. RBS ने त्यांचा business phoenix arc ला आणि phoenix arc ने कोटक ला विकलाय असे सांगत आहेत.. आणि त्या क्रेडिट कार्ड बॅलन्स नुसार १ लाख रुपये माझ्याकडे येणे आहेत असे म्हणत आहेत.. मी त्यांना सांगतोय कि जर मी असे काही कार्ड घेतलेच नाही तर पैसे का भरू?