Skip to main content

मानववंशशास्त्र

त्वचेचा वर्ण

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 24/09/2022 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न आहे. जर पहिला माणूस अफ्रिकेत जन्माला आला असेल आणि अफ्रिकेत जन्मलेला तो माणूस आणि त्याची जी कोणी सहचारिणी असेल आणि ती सुद्धा अफ्रिकेत जन्मल्यामुळे हे दोघेही कृष्णवर्णीय असतील तर त्यांच्या संबंधातून जन्मलेली पुढची सगळी प्रजा ही सुद्धा कृष्णवर्णीय असायला हवी हा साधा तर्क आहे. पण प्रत्यक्षात मात्र युरोपियन लोक हे 'गोरे' कसे? शिवाय बहुतांश युरोपियन लोकांचे डोळे घारे कसे? जर आदिमानव जोडपे काळे असेल तर मग युरोपियन वंशाची प्रजा ही गोरी कशामुळे झाली? काही जनुकीय बदल घडले का? की इतर काही कारण? हे कधी घडले? किती वर्षे गेली यात? भारतात २ हजार वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय लोक इझराईलमधून आली.