Skip to main content

मानसिक आरोग्य

माझा होर्डिंग ओसीडी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 24/05/2023 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तके आवरायल घेतल की नैराश्य येत. काय ठेवायच काय नाही हे ठरवताच येत नाही . ज्योतिषातील अनेक दुर्मिळ पुस्तके, अंधश्रद्धा, तत्वज्ञान, मानसशास्त्र समाजशास्स्त्र ,अध्यात्म, विज्ञान, अशा विषयांवरील विविध पुस्तके त्या त्यावेळी घेतली होती. कधी वाटत आता बास झाल घालून टाकाव रद्दीत पण धाडस होत नाही. किती भूतकाळ उराशी बाळगायचा? पत्रव्यवहार कात्रणॆ हस्तलिखिते लेख यांच्या फाईली किती कवटाळायच्या. दर वेळी आवरायला घेतो व धाडस होत नाही. याला कचरा म्हणवत नाही. तरी महत्वाचा भाग ई ग्रंथालायांवर अपलोड करुन ठेवला आहे आपण गचकलो तरी तो जालसागरात उपलब्ध असेलच.

मानसिक आरोग्यातील स्टिग्मा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 21/06/2021 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी सा या मानसोपचार या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेच्या मिटिंगला हितचिंतक या नात्याने गेलो होतो. डॉ अनिल वर्तकांशी फोन व ईमेलवर भेटलो होतो पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मिटिंग मधे stigma towards mental illness हा विषय होता. आंतरजालावर वर मानसिक आरोग्य या विषयावर असलेल्या चर्चांची माहिती मी तिथे दिली. खर्‍या नावाने तिथे वावरत नसल्याने लोक तिथे मोकळे होतात. अनेकांना व्यक्त व्हायचे असते पण लोक काय म्हणतील? या भीतीपोटी ते व्यक्त होत नाहीत व मनात गोष्टी तशाच राहतात. वर्षानुवर्षे त्या तशाच राहतात. आपण मनातल्या त्रासदायक गोष्टी जर मोकळेपणा बोललो तर समोरची व्यक्ती आपल्याला कमकुवत समजेल का?