म्हणीचा अर्थ व व्युत्पत्ती
मराठी म्हणी खरोखरच अगदी थोड्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगून जातात.. बऱ्याच म्हणी आजकाल वापरात नसल्याने ( किंवा इंग्रजीच्या फॅडमुळे वापरायची लाज वाटल्याने लोक त्या वापरायच्या टाळतात म्हणून...) काही वर्षात नामशेष होतील कि काय असे वाटते. आमच्या वेळेस ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या सिलॅबस ला म्हणी होत्या..त्यामुळे बऱ्याच म्हणी पाठ झाल्या व अजूनही त्यांचे अर्थ ही माहीत आहेत.
मी कुणाच्या भावना न दुखावता एक शंका विचारू इच्छितो की : "सोनार , शिंपी,कुलकर्णी अप्पा , यांची सांगत नको रे बाप्पा " या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? आणि ही म्हण कशी तयार झाली असावी?
याद्या
17174
मिसळपाव