Skip to main content

लंबी रेस का घोडा...

लंबी रेस का घोडा

दिनेश५७ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
कोणातरी टीव्ही अॅंकरने आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला. ती तसे बोलली तेव्हा समोरचा मायक्रोफोन सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे त्या वक्तव्याचा व्हिडिओ विनाविलंब व्हायरल झाला. तिच्या या वक्तव्याबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये नापसंती वा संताप दिसतो. पण त्याचे कारण अनाकलनीय वाटते. ‘ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा... लिखके रख लीजिये’ असे या अॅंकरचे ‘आॅफ दि माईक’ वाक्य स्पष्ट एेकू येते. तिच्या या वाक्यामुळे काहीजण अस्वस्थदेखील झाले असून त्या वाहिनीने ताबडतोब खुलासा करावा, असे काहींनी म्हटले आहे.