Skip to main content

लेख - ब्लॉग

फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५ . १) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींचा लहरीपणा चेह-याला लावण्याच्या क्रीममुळे गोरेपणा येत नाही, तेव्हा असे दावे करणा-या कंपन्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दत्तू यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर अशा दाव्यासाठी ग्राहक न्यायालयाकडे जावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या मते मुख्य न्यायमुर्तींचे हे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. ग्राहक न्यायालय फार तर एखाद्याने विकत घेतलेल्या अशा क्रिमची किंमत परत करण्यास सांगू शकते, फार तर फार असे खोटे दावे केल्याबद्दल काही दंडही करू शकते.

अराजक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 27/10/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
अराजक - डॉ. सुधीर रा. देवरे केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का?