Skip to main content

लाॅकडाऊन

लाॅकडाऊन: सदतीसावा दिवस

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 30/04/2020 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
....या जगण्यावर शतदा प्रेम करावे तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की ज्या गोष्टीचा आपल्या मनात विचार चालु असतो, तीच गोष्ट अचानक डोळ्यासमोर येते. काल तसंच झालं. वाचन करीत असताना एका शब्दापाशी अडखळले, तो शब्द होता..जिजीविषु. आधी वाटलं, काहीतरी चूक असावी. त्याजागी त्याच्याच जवळपास जाणारा, थोडासा अनवटच पण क्वचित प्रसंगी एेकलेला विजिगीषु म्हणजे विजयाची इच्छा असलेला असा शब्द असावा. पण म्हटलं थोडं शोधुन पाहावं तर याही शब्दाचा अर्थ सापडला. जिजीविषु म्हणजे जगण्याची इच्छा असलेला आणि जिजीविषा म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा !