Skip to main content

खरेदी मदत

सायकल घेताना निवड करण्यासाठी मदत हवी आहे.

मास्टरमाईन्ड यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या मुलासाठी (वय १३ पूर्ण १४ चालू. उंची साधारण ५'६" ) सायकल घ्यायची आहे. चिरंजीवानं स्वतः चे मित्र, आजुबाजूला दिसणारे समवयस्क आणि इंटरनेट वरुन केलेला research यावरुन असं ठरवलंय की gear चीच सायकल घ्यायची (२१ gear combination) . माझं मत असं आहे की सायकल जी मला पण कधीतरी वापरता येईल(?) (शेवटची सायकल वापरून साधारण २०-२२ वर्षं झालीयेत) अशी घ्यावी. मी सहजच सायकलींच्या किंमती पाहिल्या तर gear च्या सायकल १२००० पासून पुढे आहेत. मी कधीही gear ची सायकल वापरलेली नाही.