Skip to main content

खादाडी प्रवास रेल्वे ट्रेन विरंगुळा

भारतात रेल्वेने प्रवास करताना काय खादाडी करावी ?

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 26/05/2017 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोदकने फाऊल नोंदवल्यामुळे हा नविन धागा काढत आहे. रेल्वे आणि इतर प्रवासात सर्वात मोठा फरक म्हणजे कायम खादाडी करण्याची उपलब्धता. भारतात बहुतांश ट्रेन या दर तासाला कुठल्यातरी स्थानक मध्ये थांबतात. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक स्थानकावर काहींना-काही स्पेशल खादाडी साठी उपलब्ध असते. जसे की कुर्डुवाडी स्टेशनवर - गरम वाफ येणारी इडली सकाळी - रात्री केंव्हाही मिळते. ट्रेन २ मिनिटे थांबते पण ज्याला आवडते त्याला ती मिळतेच. तर हा धागा अश्या स्पेशल खादाडी साठी जी आपल्याला रेल्वे प्रवासात करता येते. आपल्याला आवडणाऱ्या रेलवे स्थानकातील किंवा रेल्वेतील केटरिंगच्या आवडणाऱ्या खादाडी साठी.