आखाती देशांमधे नोकरी करण्यासंबंधाने माहिती मिळावी या हेतूने हा धागा काढला आहे.प्रामुख्याने अभियांत्रिकी क्षेत्रातल्या म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध असलेल्या नोकर्या आणि एकूणच तिथली सामाजिक परिस्थिती याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला,वाचायला मिळतात.पण यातील खर्या किती आणि अफवा किती याची वास्तव माहिती मिळावी विशेषत: आखाती देशांत नोकरी करणार्या,काही काळ नोकरी केलेल्या मिपाकरांकडून.शिक्षण नोकरी रोजगार इत्यादीसारख्या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही अशी नसतात आणि हे व्यक्ती सापेक्ष आहे तरीही एकंदरित तिथल्या वातावरणाची कल्पना यावी आणि तिथे नोकरीनिमित्तानं जाऊ इच्छिणार