Skip to main content

कोकण बेरोजगारी

निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

लेखक सुरवंट यांनी रविवार, 07/02/2016 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का? निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी. कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती? किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले. आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा. कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय?