Skip to main content

कला

मॉडेलचा झगा

लेखक मनस्विता यांनी शनिवार, 15/08/2026 21:59 या दिवशी प्रकाशित केले.

मागच्या रविवारी आमच्या Art Kitty चे एक वर्कशॉप होते. Art  kitty नावाप्रमाणेच गप्पा-गोष्टी, खाणं-पिणं आणि कला असं सगळं एकत्र असतं. तर तेव्हा काही तरी विषय निघाला आणि आमच्या मॅम म्हणाल्या की त्या पुण्यातील चित्रकारांच्या ग्रुपमध्ये आहेत आणि शुक्रवारी त्यांना पोर्ट्रेट drawing साठी एक मॉडेल हवा/हवी आहे. मी म्हटलं की तुम्हाला तर जरा सुरकुतलेला चेहरा असलेले लागतात ना? जेवढे जास्त बारकावे टिपायला तेवढे तुमच्यासाठी आव्हानात्मक. तर म्हणाल्या 'नाही, नाही असं काही नाही'. आणि मला विचारलं की तुम्ही येता का मॉडेल म्हणून? मी पण बिनधास्त लगेच हो म्हणाले. 

गोंड चित्रकलेचा माझा प्रयत्न

लेखक मनस्विता यांनी मंगळवार, 11/08/2026 08:29 या दिवशी प्रकाशित केले.

 आपल्या देशात अनेक आदिवायी आणि त्यांनी जोपासलेल्या कला आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाशी जोडलेली घट्ट नाळ दिसून येते. त्याचबरोबरीने त्यांच्या समूहाचा एकत्रित अनुभव, आठवणी यांचं चित्रण असते.

मी काढलेले हे चित्र असेच एक उदाहरण आहे. एक आर्ट वर्कशॉप अशी सुरु झालेली सामूहिक क्रिया, मैत्रीण, घरची मंडळी अशा सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची ही एक गोष्ट आहे.      

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत ? (एप्रिल २०२१)

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 15/04/2021 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्‍या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे.

मार्गदर्शन हवंय! मिनिएचर्स बद्दल!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/04/2017 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंजु यांच्या धाग्यावर मी माझ्या व्हिज्युअल स्पेशिअल सेन्स बद्दल उल्लेख केला आहे.निसर्गाच्या या थोड्याशा वरदानामुळे लहानपणापासून एक छंद सोबतीला आहे. मिनिएचर्सचा!