Skip to main content

किल्ले माहितगारांचा सल्ला

तोतया शिवाजीं बरोबरचे वाटाडे - भाग - 2

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 15/04/2018 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

लढा पावनखिंडाचा वाटाडे - भाग 2 तोतया शिवाजीं बरोबरचे वाटाडे

ऐनवेळी सोपा झेल सुटलेल्या किंवा जवळूही गोल करता न आल्याने खेळाडूंची पराभूत मानसिकता जशी बराच वेळ टिकून असते तशीच अवस्था सिद्दीच्या सैन्याची झाली असेल. चार महिने गडाला गराडा घालून बसल्याने एक प्रकारची शीथिलता आलेल्या सेनेची भर पावसात मध्यरात्री झालेली परवड बोचणी देत असेल. आपल्या मुख्य सरदाराला फसवून शिवाजीने जो विश्वास घात केला याचा राग व हताशा प्रत्येक शिपायाला सतावत असणार.