Skip to main content

काळ

उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही)

लेखक माहितगार यांनी शनिवार, 19/12/2015 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा केवळ सातत्याने उशीरहोणार्‍यांना त्यांची भूमिका ज्येनुआईनली समजून घेण्यासाठी आहे, या धागा लेखाचा उद्देश मुळीच सर्कॅझम अथवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टिका नाही. वेळ व्यवस्थापना बद्दल मी वेगळा धागा काढणार आहे त्यामुळे तोपर्यंत टिका सर्कॅझम अथवा वेळ व्यवस्थापना बद्दल चर्चा करू इच्छिणार्‍यांनी येथूनच रजा घेतल्यास आभारी राहीन. वेळ व्यवस्थापनाबद्दल मी व्यक्तीशहा आग्रही असलो तरीही युअ‍ॅप्टीट्यूड म्हणजे दुसर्‍यांची ज्येनूआईन भूमिका अडचण समजून घेणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दलही मी तेवढाच आग्रही असतो.