Skip to main content

जनातलं मनातलं

महापूरानंतरचं लोणावळा...

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 16/07/2026 21:38 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळेत प्रचंड मोठा पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये तर पूर्ण पावसाळ्याइतका पाऊस दोन दिवसांमध्ये पडला. त्यामुळे लोणावळ्यात मोठा पूर आला आणि इंद्रायणी- पवना नद्यांनी लोणावळ्यापासून पिंपरी चिंचवड- आळंदीलाही तडाखा दिला. लोणावळ्यातले माझे मित्र श्रीरंगजींच्या परिसरात आठ फूट पाणी होतं. योगेश्वर सोसायटी, भांगरवाडीतलं त्यांचं तळमजल्यावरचं घर दोन दिवस अर्ध पाण्यात होतं. महापूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याशिवाय लोणावळ्यातल्या हुडको भागातल्या वस्तीला महापूराचा मोठा फटका बसला. तिथे एनडीआरएफने बोटींमधून लोकांना वाचवलं. 

ऑशविट्झमधली वीरांगना- माला झिमेटबाऊम

लेखक मार्गी यांनी बुधवार, 17/06/2026 22:01 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ऑशविट्झ छळछावणी- इतिहासातील कलंक 

✪ नरकामध्येही मालाने जपलेली माणुसकी आणि जिद्द 

✪ ऑशविट्झमधून सफल पलायन पण... 

✪ वाचू शकला असता पण मालासोबत पकडला गेलेला तिचा मित्र 

✪ स्वत:च्या रक्तरंजित हाताने गार्डला थप्पड 

✪ काळरात्रीला उजळून टाकणारी तेजशलाका 

महाराष्ट्र दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/05/2026 15:08 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.

 

कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच  ढाराढूर  झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची  विस्कटलेली चादर  निट केली.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥

सार्वजनिक "व्यक्त" होणे

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 27/03/2020 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारत सरकारने ने ५ वाजता करफू सम्पल्यावरती आवाज करा हे जे आव्हान केले होते त्याची कुचकी चेष्टा खूप झाली त्या तमाम लोकांना उद्देशून.. हे बघा इंग्लड मध्ये सुद्धा त्याच धर्तीवर समाज आपल्या भावना व्यक्त करीत आहे संकटकालीन काम करणाऱ्या ना ( यात वैद्यकीय तर आलेच पण इतर देश चालवयाला लागणारे पडद्यमागचे हि अनेक) यांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यानं हे जाणवून देण्यासाठी कि बाकी समाज आपल्या या अवघड समयी च्या कामाची कदर करतो इंग्लड मधील रहिवासी गुरुवारी रात्री ८ वाजता "clap for our carers " म्हणून घरातून टाळ्या वाजवताना दिसले यातून पुन्हा सिद्ध झाले कि असे सार्वजनिक "व्यक्त" होणे हे अनेक समाजात के

अच्छे दिन

लेखक Nitin Palkar यांनी गुरुवार, 23/01/2020 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
जेनेरीक औषधे हा थोडासा दुर्लक्षित विषय. माझ्या बघण्यातील अनेक डॉक्टर्स त्या विषयी काहीसे आकसानेच बोलताना ऐकलंय. आमच्या फॅमिली डॉक्टरांचं वक्तव्य, 'परदेशी औषध कंपन्यांचे योग्यता चाचणी निकष किती काटेकोर असतात, या देशी कंपन्यांचा काय भरवसा?' मी त्यांना विचारलं, जर पंत प्रधान स्वतः 'प्रधान मंत्री जन औषधी योजना' या नावाने ही योजना राबवत असतील तरीही त्यांचे निकष भोंगळ असू शकतील का'?' आमच्या घराजवळ अलीकडेच दोन जेनेरीक औषधांची दुकाने सुरु झालीयत. त्या पैकी एक भारतीय प्रऔद्योगिकी संस्थेच्या (IIT Bombay) सहकार्याने. नित्योपयोगतील काही औषधे काल तिथून खरेदी केली. सवयीप्रमाणे कॅश मेमो घेतला.

मतदानाची गोष्ट

लेखक Nitin Palkar यांनी मंगळवार, 30/04/2019 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळेस मतदान केंद्र मेरी इमॅक्युलेट विद्यालय, बोरिवली येथे होते. हे विद्यालय मंडपेश्वर टेकडीच्या पायथ्याशी, टेकडीचा बराच भाग व्यापून उभे आहे. टेकडीच्या नैसर्गिक उताराचा योग्य असा वापर करून शाळेच्या इमारती बांधल्या आहेत. या विद्यालयात मतदान कक्ष वेगवेगळ्या स्तरांवर(levels) होते, जिथे पोहचण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागले. माझा मतदान कक्ष सुमारे सहाव्या मजल्याच्या उंचीवर होता. घामाघूम होऊन तिथे पोहोचलो व रांगेत उभा राहिलो. मतदान करून बाहेर आल्यावर बघितले तर तिथे पोहचण्यासाठी दुसऱ्या बाजूने उताराचा रास्ता (ramp) होता.