योजना ब / क / ड ....
नैसगिक आपत्ती, अपघात, विसळभोळेपणा, कोणचा तरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा, चोरी, अवक्तशीरपणा इत्यादी संकटातुन कोणी चुकलेली नाही.
हि संकटे एक - एक आली तर थोडे स्वता:ला संभाळण्यासाठी वेळ आणि संधी मिळते. पण जर ती एकत्र आली तर मग मात्र खरे नाही.
१. साधारणतः जुन २०१४ मध्ये मला मुलाखतीला जायचे होते. ज्या ठिकाणी मी राहयला होतो ते घर बंद होते आणि माझ्याकडे किल्ली नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा बोर्या उडला.
२. २०२१ मध्ये मी विंडोसमध्ये मायक्रोसॉफ्ट्चे खाते जोडले, पण मला परवलीचा शब्द ( पासवर्ड ) त्या खात्याचा आठवत नव्हता. संगणकने स्वतः मला न विचारता संकेताक्षर बदलले.