Skip to main content

जात

जाती आधारीत जनगणना २०११ च्या निष्कर्षांचा पहिला टप्पा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 04/07/2015 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी जातींचा जातीवादाचा आणि जात आधारीत जनगणनेचा समर्थक नव्हतो नाही आणि नसेन. कारण कोणत्याही मनुष्याच्या व्यवसाय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणारे जन्माधारीत जात विषयक निकष व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या आरोग्यास आणि प्रगतीस हितावह नाहीत आणि कोणतीही जातीय गणना धार्मीक, सामाजीक, राजकीय आणि आर्थीक नेतृत्वाचे जाती निर्मुलनातील अपयश भरून काढण्यास कितपत उपयूक्त ठरेल या बाबत मी प्रामाणिकपणे साशंकीत राहीलो आहे.