Skip to main content

इतिहास

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 28/08/2023 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ?

१८५७ चे स्वातंत्र्य समर

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 12/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले. इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले.

द कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या निमित्ताने

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 18/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला.

कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 18/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734 त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ?

बहार पुरवणी - पुढारी मधून प्रकाशित लेख माला भाग १ ते ७

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 10/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, पावनखिंडीतला लढा ही लेखमाला पुढारीतील बहार पुरवणी अंकात प्रकाशित होते आहे. जागे अभावी लेखातील अनेक फोटो, नकाशे तिथे प्रकाशित करता आलेले नाहीत. म्हणून मूळ लेख इथे सादर करत आहे. आधी हे लेखन इथे सादर केले होते त्यात काही बदल केले आहेत म्हणून कदाचित पुन्हा वाचायला आनंद वाटेल. नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल. भाग ६ आणि अंतिम ७ अजून अप्रकाशित आहेत. ते यथावकाश सादर करेन.

भाग - 6 कांचन बारीतील संघर्षानंतर …

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 14/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ६

कांचन बारीतील संघर्षानंतर …

वणी - दिंडोरी च्या वाटेवरील झालेल्या संघर्षांत मुघल सेनेच्या वाताहतीमुळे महाराज उत्साहित झाले असावेत. मुघलांच्या सैन्याला पुन्हा जोमाने लढायला तयार करायला नंतर तीन ते चार महिन्याचा कालखंड लागला असावा. त्या दरम्यानच्या वेगवान घडामोडींच्या तपशीलातून महाराजांच्या आधीच्या समरापेक्षा ह्या मोहिमा बदलत्या रणतंत्रामुळे जास्त धीट, प्रहारशील आणि मुघलांच्या संघर्षाची मानसिकता (विल टू फाईट) नष्ट करायला कारणीभूत झाल्या असाव्यात हे जाणवते.

भाग 5 - कळवणवरून भराभर सरकता तांडा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 12/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.

भाग 5

कळवणवरून भराभर सरकता तांडा

मुल्हेरची ‘पेठ’ ही वाहतूक करणाऱ्या मालजनावरांच्या अदलाबदलीकरिता प्रसिद्ध असावी. अहवा ते सध्याच्या काळात ताहेराबाद. हा घाटवाटांच्या उभ्या चढणीचा, चिंचोळ्या वाटेचा भाग, जंगलातील अदिवासी व अनेक लुटारू टोळ्यांनी घेरलेल्या प्रदेशातून तांडा श्रमपूर्वक घाटमाथ्यावर आला असावा. मुल्हेरच्या आसमंतात आल्यावर गुजराती भाषेचा प्रभाव कमी होऊन मराठी बोलीचा वापर करणाऱ्या मुलखात प्रवेश केल्याचे जाणवले असावे.

‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत

लेखक Kadamahesh5 यांनी शुक्रवार, 31/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत समर्थ रामदासस्वामी यांनी संपूर्ण भारत खंड पाहिल्यानंतर आपल्या आनंदवनभुवनी स्फुट काव्यात सुंदरमठ परिसराचे वर्णन करतात. हा सुंदर मठ म्हणजेच आनंदवनभुवनी. संपूर्ण भारत वर्षात समर्थांचे जेवढे मठ होते त्या सर्व मठांचा 'सुंदरमठ रामदास पठार' हा मुख्य मठ होता. ह्या मठाचे दोन भाग आहेत.