(आपल्या संगीतप्रेमी मित्रांना खालील पुरावे अवश्य वाचावयास द्या!)
सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड (संगीत, अर्थात पंधरावे महापातक)
नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन प्रपंच.
समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात रामदासी मल्हार इ.