Skip to main content

ईशान्य

ईशान्येच राजकारण

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/01/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य. नागपूर हा भारताचा मध्य पकडल्यास बंगाल, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा हे प्रदेश इशान्येला आहेत. ब्रह्मदेश, चीन, भूतान आणि नेपाळ ह्या देशांच्या सिमा भारताच्या ईशान्येच्या राज्यांना टच करतात. अगदीच मोठी घटना असल्याशिवाय ईशान्येला काय -राजकारण आणि इतरही- काय शिजतय याची गंधवार्ता कानावर कमी पडते आणि चर्चा ही कमी होते.