Skip to main content

घनश्याम धेंडे

जेष्ठ गझलकार श्री. घनश्याम धेंडे यांचे दुःखद निधन

लेखक psajid यांनी शनिवार, 15/04/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज दैनिक लोकमत मधील एक बातमी वाचून खूप वाईट वाटले काल म्हणजे शुक्रवार दि. १४ एप्रिल २०१७ रोजी जेष्ठ गझलकार श्री. घनश्याम धेंडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे 'बासरी' व 'तहानलेलं तळे' हे दोन मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. गझल लेखनातील हझल, गीत, विडंबन, लावणी इत्यादी प्रकारामध्ये विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी पणजी येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अनेकदा मला त्यांना व्यासपीठावर प्रत्यक्ष गझल वाचताना ऐकण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.