शांतिदेवी
मुलांच्या पूर्व जन्माच्या आठवणींबद्दल एक उत्तम नमुना म्हणजे शांती देवी. महात्मा गांधीनी नियुक्त केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या एका समितीने त्यांची तपासणी केली होती. ते शान्तिदेविन्सोबत त्यांच्या पूर्वजन्मीच्या गावीही गेले आणि तेथील घटनांचा आढावा घेतला.
१८ जानेवारी १९०२ रोजी मथुरा येथे राहणाऱ्या चतुर्भुज च्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव लुगडी ठेवण्यात आल. जेव्हा ती १० वर्षांची झाली तेव्हा जवळचा एक दुकानदार केदारनाथ चौबेसोबत तिचा विवाह करण्यात आला. हे केदारनाथ चं दुसरं लग्न होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. केदारनाथची मथुरा आणि हरिद्वार इथे कपड्याची दुकानं होती.
मिसळपाव