Skip to main content

Education

माझा पदार्थ विज्ञान ब्लॉग : मुलांनी Physics मध्ये निदान पास तरी व्हावे यासाठीचा प्रयत्न!!!

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 26/07/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्व प्रथम माझ्या ब्लॉग ला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी ही ज्ञानभाषा आहे हे तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून सिद्ध केलंत .. आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही.

कॅनडातील (कनाडा) वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संधी

लेखक विक्रांत यांनी शुक्रवार, 20/11/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.