Skip to main content

चष्मे

चष्मे लावणारे इंडॉलॉजीस्ट, इंडॉलॉजीस्टांचे चष्मे

लेखक माहितगार यांनी शनिवार, 05/03/2016 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही अभ्यासक त्याला प्राप्त झालेल्या दृष्टीकोणातून एखाद्या विशीष्ट गोष्टीकडे पहात असतो हे सहाजीक असावे. आपण स्वतःला स्वतःच्या भूमिकेतून अधिक चांगले समजून घेऊ शकतो तेवढे एखादी त्रयस्थ व्यक्ती समजून घेऊ शकणार नाही. क्रिकेटच्या पिचवर पिच कसा होता बॉल कसा आला बॅट्समन प्रत्यक्षात कसा खेळला हे तो क्षण जगणार्‍या बॅट्समनला आणि बॉलरलाच माहित असावे, त्यांच्याकडे बघणार्‍या इतर सर्वांनाच ते दृष्य वेगवेगळ्या अँगल मधून दिसत असते. म्हणजे किमान वेगवेगळे अँगल आलेले असतात. त्यात जर ते प्रेक्षक चष्मे घालत असतील तर दृष्य प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या त्याच्या चष्म्यानुसार दिसणे सहाजिक असावे.