Skip to main content

चक्रपूजा

'चक्रपूजा' माहिती सोबतच कोकणी ते मराठी अनुवाद साहय्य हवे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 25/04/2016 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील बगाड अथवा आंध्रातील सिरीमानू समकक्ष झारखंडातील परंपरेस चरकपूजा म्हणतात, आपल्याकडील बगाडमध्ये झारखंड समकक्ष 'तंत्रपूजा' आंतर्भूत आहे का माहित नाही. शाक्तपंथीयांच्या परंपरेतील "चक्रपूजा" आणि "चरकपूजा" कदाचित भिन्न असाव्यात कदाचित सुरवात सेम असेल जे काय असेल ते मला मुळीच माहीत नाही. "चक्रपूजा" आणि "चरकपूजा" यांचे विकिपीडिया लेखांच्यादृष्टीने नि:संदिग्धीकरण करून हवेच आहे तर त्या निमीत्ताने महाराष्ट्र आणि भारतातील काही समुदायात होणार्‍या पारंपारीक "चक्रपूजा" या विषयावर विकिपीडियावर कदाचित लेख लिहून होऊ शकेल.