मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भौतिक शास्त्र

एकच ध्रुव असलेला चुंबक

विजुभाऊ ·
कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो. चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण ) एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल. हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात. समजा काही बल लावून ( म्हणजे बांंधून / चिकटवून ) दोन पट्टी चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे दोन्ही दक्शीण ध्रुव एकमेकाना जोडले ( उ-द + द-उ ) तर पट्टी चुंबकाच्या दोन्ही बाजूस उत्तर ध्रुव असेल.