Skip to main content

भाषांतर

असा काही नियम आहे का?

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 26/01/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका भाषाविषयक व्हॉटसअॅप समुहातील चर्चेवर हा धागा आहे. WhatsApp,Facebook,YouTube किंवा अशाच काही अॅप्सची,सॉफ्टवेअर्सची नावे ही विशेषनामे आहेत.ही नावे स्वामित्वहक्क संस्थांकडे रजिस्टर केलेली आहेत.ही नावे मराठीत जशीच्या तशी वापरायला तशी समस्या काहीच नाही.पण यांच्या मराठीकरणामुळे किंवा एकूणच कोणत्याही भारतीय भाषिकांनी त्यांच्या भाषेत भाषांतर करणे हे नियमबाह्य आहे का? किंवा तो गुन्हा वगैरे काही आहे का? असल्यास शिक्षा किंवा दंड काय आहे? WhatsApp = कायप्पा YouTube = तू नळी Twitter = चिवचिव Facebook = चेहरापुस्तक/चेपु असे भाषांतर करणे अयोग्य आहे का?

समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/07/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत. धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे.

'मुक्त सांस्कृतिक काम' (अनुवादात तपासण्यात साहाय्य हवे)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 01/07/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त सांस्कृतिक काम कशास म्हणावे या संबंधाने असलेल्या खालील दस्तएवज लेखाचे मूळ इंग्रजी लेखन Erik Möller या ज्रर्मन व्यक्तीनेhttp://freedomdefined.org/Definition या संस्थळावर केले आहे त्याचा हा मराठी अनुवाद.