Skip to main content

भाग १- तुमचे काम आणि पगारवाढ !

!!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

लेखक kvponkshe यांनी बुधवार, 18/02/2026 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ ते २००६ मी भूगाव पुणे येथे एका लिमिटेड कंपनीत प्रोडक्शन मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होतो. पगारवाढीसाठीचे डिस्कशन अगदी तोंडावर येऊन ठेपले होते. सोबत मार्च चे टार्गेट कम्प्लिट करायचे होते. आमची कंपनी ऍक्सेस कंट्रोल सिस्टम्स बनवायची. माझे काम PCB टेस्ट करणे, डिबग करणे, सिस्टिम नीट असेम्बल होतीये की नाही ते पाहणे आणि फायनल टेस्ट करून ती सिस्टिम QA ला देणे, आणि QA मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो दुरुस्त करून परत टेस्टिंग करून ती सिस्टिम QA ला देऊन मग फायनल पॅकिंग ला देणे असे होते. एकदा QA ला दिलेली सिस्टिम बर्न इन टेस्ट मध्ये फेल गेली. आणि एक नाही तर त्या बॅच च्या सगळ्या च फेल जात होत्या.