Skip to main content

बँक

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक मुदत ठेव

लेखक डोके.डी.डी. यांनी रविवार, 28/05/2017 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्या तर काही बंद ही पडल्या त्या आता फक्त शेतकरी विमा वाटप एवढेच काम करतात. त्यावेळी चालू असणाऱ्या अशा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद या बँकेत मागील 10 वर्षांपूर्वी खाते उघडून कष्टाच्या पैशातून 36000 हजार रु दाम दुप्पट साठी मुदत ठेव ठेवली होती. मागील 2 वर्षांपूर्वी मुदत संपली पण मधल्या काळात बँक डबघाईला आली किंवा अंशतः बंद पडली बँकेने पैसे नाहीत म्हणून रक्कम दिली नाही. दीड वर्षासाठी परत मुदत ठेव करायला लावली. पण आता मुदत संपली तरी बँक पैसे देत नाही.