Skip to main content

ब्लॉग्स

ब्लॉग्सची उल्लेखनीयता इत्यादी..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 14/01/2017 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव, मायबोली अशा संस्थळांवर किंवा ब्लॉग्सवर कोणत्या विषयावर लेखनास सुरवात करावी या वर खुपशी बंधने नसतात. मराठी विकिपीडिया आणि मराठी विश्वकोश हे ज्ञानकोश आहेत. मराठी विश्वकोशासारख्या ज्ञानकोशात ज्ञानकोशीय नोंद लिहिणारा, समिक्षक आणि त्याचा संपादक कोण असेल यावरच पूर्वपात्रतेची गाळणी असते पण एकदा हे निकष पूर्ण करणार्‍या लेखकाने कोणते स्रोत वापरले यावरची बंधने अल्पशी शिथील होतात.