Skip to main content

बचत

पैसा बचा डॉट कॉम

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 30/06/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध होत याची चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढतो आहे. धाग्याचा उद्देश ब्र्यांडेड उत्पादनांची किंमत वाढवून पून्हा सेल अथवा डिस्काऊंट दाखवून जाहीरात व्हावी असा नाही, सध्या इतर भाज्या महाग असताना बटाटे कांदे कमी दरात आहेत तर अशा ग्राहकोपयोगी उत्पादनांबद्दल कुठे, केव्हा आणि काय खूप कमी किमतीत उपलब्ध झाले/असते याची माहितीची मिपाकर वाचकांनी देवाण घेवाण करावी. मिपावरील शेतकर्यांचे हित होईल का ? या धागा चर्चेत शेतकरी कसा नाडला जातो आणि आर्थीक फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यातील अडचणींची चर्चा झाली आहे.