Skip to main content

आवड

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

नसत्या उपद्व्यापांतून सुटका

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 27/10/2020 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान: http://www.misalpav.com/node/47778 सदर धाग्यावरुन सुचल्याने आभार मानतो. आता मला माझ्याच एका प्रॉब्लेमबद्दल कोणी मदत करु शकेल का पहा. सदर धाग्यात गायनकला चांगली नसणार्‍यांचे स्वानंदासाठी गायन याबद्दल लिहिले आहे.ही कला माझ्याकडेही आहे.म्हणजे मलाही गायनाची आवड आहे.गाणी गुणगुणायला आवडतात.याउप्पर शीळही चांगली घालतो.यासोबतच मला चित्रेदेखील चांगली काढता येतात.कागदापासून विविध वस्तू बनवतो.

ओढ....

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 14/02/2019 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना!