Skip to main content

आता बुरख्यातलीही बार्बी येणार

निरागस ‘हिजार्बी’

लेखक पी महेश००७ यांनी मंगळवार, 09/02/2016 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
निर्जीव बाहुलीशी लहानग्या मुलीचं कधी काळी घट्ट नातं होतं. आता मोठ्यांचं आहे! म्हणजे चिमुरडीसाठी बार्बी डॉल घेऊन यायची आणि शोकेसमध्ये ठेवायची! असो... पण या बाहुल्यांना धर्म नव्हता. तो तिच्याशी खेळणाऱ्या मुलीकडेही कधीही नसेल आणि नसणार. कशीही असो, ती त्या चिमुरडीची छकुलीच असते. अगदी त्या बाहुलीच्या हाताची बोटे खरवडलेली असली तरीही! तुम्ही चिमुरडीला कधी तरी विचारा, की दिसायला कोणासारखी आहे? तर ती एकच उत्तर देईल.... परीसारखी! ती चिमुरडी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही, की माझी बाहुली ख्रिश्चन दिसावी, मुस्लिम दिसावी, हिंदू दिसावी.... वगैरे वगैरे... निरागस मनांना धर्म नसतो.