Skip to main content

अर्थकारण; अर्थव्यवस्था; गुंतवणूक; सोने; सुवर्ण

सोने एक लाखावर...

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 23/04/2025 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे. सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -
  • १९६४ साली सोने साठ रुपये तोळा होते.
  • १९७७ साली सोने ५०० च्या घरात होते.
  • २००५ साली (माझे लग्न झाले तेंव्हा) सोने ६००० होते.
  • २००७ साली पहिल्यांदा सोन्याने पाच आकडी किंमत गाठली होती.
  • आता सोन्याने सहा आकडी किंमत गाठली आहे.