Skip to main content

आर्थिक कृषी

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

मदत हवी आहे.

लेखक जावई यांनी सोमवार, 06/07/2020 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..! मी हर्षद जाधव. इंदापूर जि.पुणे. येथील एक शेतकरी आहे मी जि पोस्ट टाकतोय ती मिपाच्या अधिकृत धोरणात बसते की नाही,काय माहीत? म्हणून सर्वप्रथम मी संपादक मंडळीची माफी मागतो.असो मी एक पूर्णवेळ शेती करणारा शेतकरी आहे.शेतीत ऊस ,केळी,कांदा,अशी पिके घेत असतो.सध्या शेतीत केळीचे पहीले पिक काढण्यासाठी तयार झाले आहे.पण लॉकडाऊनमुळे कोणी व्यापारी फिरकत नाही.साधारण ५० टन केळी निघेल असा अंदाज आहे. मिपावर वेगवेगळ्या भागातील अनेकजण आहेत. तुमच्यापैकी कोणी केळीचा व्यापारी आहे का? किंवा दुसरे कोणी व्यापारी आपल्या संपर्कात आहे का.

बळीराजा कर देणार का ?

लेखक मारवा यांनी सोमवार, 18/07/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
भुमिका भारत स्वतंत्र झाल्यापासुन ते आजपर्यंत देशात काही मोजके अपवाद ( काही राज्ये वगळता व त्यातही मोजक्या उदा.चहा कॉफ़ी प्लॅन्टेशन इ.) सोडुन कुठल्याही प्रकारच्या कृषी उत्पन्नावर ( पुन्हा मोजकेच अपवाद व संबंधित तरतुदी वगळता ) सर्वसाधारणपणे कृषी उत्पन्नावर (अ‍ॅग्रीकल्चरल इनकम) कुठल्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. एक विशाल जनसमुदाय कर देण्याच्या, लोकशाहीतल्या नागरीकाच्या महत्वपुर्ण कर्तव्यापासुन कायदेशीररीत्या वंचित ठेवण्यात आलेला आहे.