Skip to main content

आरोग्य;आरोग्य सल्ला;चर्चा;व्यायाम;प्राणायाम;योग

...अजून सहाच महिने राहिलेत; शरीर-समृद्धी-संकल्प पूर्ण करा

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 01/07/2024 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो. खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे. आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे - -: पोटाचा घेर किमान तीन इंचांनी कमी करणे :- अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे. मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे.