१९४७ मध्ये फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले. पाकिस्तान हा भौगोलिक दृष्ट्या चमत्कारिक देश होता. पश्चिम व पूर्व पाकिस्तान एकमेकांपासून फारच दूर होते. पश्चिम पाकिस्तानचा भौगोलिक आकार मोठा होता तर पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा जास्त होती. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचा ह्या दोन्ही भागांमध्ये फार मोठी सांस्कृतिक भिन्नता होती. जरी पश्चिम पाकिस्तानात ४ वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रांत होते तरी त्यांनी त्या सर्व भाषा सोडून उर्दू ही उत्तर भारतीय भाषा राष्ट्रभाषा म्हणून निवडली.
पाकिस्तान च्या तत्कालीन राजकीय नेत्यांनी संपूर्ण देशात उर्दू भाषेची सक्ती केली.