Skip to main content

अमेरिकन फूटबॉल

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

लेखक फेरफटका यांनी सोमवार, 06/02/2017 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं.