अमेरिकेचे अध्यक्ष
नमस्कार मंडळी,
भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे आज, २० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसर्यांदा शपथ घेतील. अमेरिकेचे अध्यक्ष आणि संबंधित विषयांमध्ये मला भलताच रस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या विषयावर सगळी एकत्रित माहिती मिपावर असावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. लिहिण्यासारखे खूप काही आहे. मात्र सगळे काही आजच लिहिले तर हा धागा विनाकारण लांबलचक होईल म्हणून आज पहिले पाच मुद्दे लिहिणार आहे आणि साधारण दर दोन दिवसांनी एक नवा मुद्दा प्रतिसादांच्या स्वरूपात लिहिणार आहे. ही सगळी माहिती मी वेगवेगळ्या स्त्रोतांमधून वाचलेली किंवा बघितलेली आहे.
मिसळपाव