Skip to main content

मॅरेथॉन

पुणे सायकलिंग 'ग्रँड टूर' म्हणजे नक्की काय? सायकलिंगची 'वारी' ते जागतिक दर्जाचा थरार!

लेखक Avinash Anushe यांनी शनिवार, 24/01/2026 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे सायकलिंग ‘ग्रँड टूर’ : सायकलिंगची वारी की जागतिक दर्जाचा थरार? पुणे आणि सायकल यांचं नातं म्हणजे अगदी मिसळ आणि पाव — एकमेकांशिवाय अपूर्ण! एकेकाळी “सायकलचे शहर” म्हणून ओळखलं जाणारं पुणे आज पुन्हा एकदा त्या ओळखीला नवं, भव्य आणि जागतिक रूप देत आहे. सध्या शहरात एका शब्दाची जोरदार चर्चा आहे — ‘ग्रँड टूर’ (Grand Tour). अनेकांच्या मनात प्रश्न येतोच, “आपण लहानपणापासून सायकल चालवतोय, मग यात एवढं ‘ग्रँड’ काय?” “ही नुसती नवी फॅशन आहे का?” उत्तर आहे — नाही! ही फक्त रविवारी सकाळी दोन पेडल मारण्याची गोष्ट नाही.

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

लेखक shawshanky यांनी शुक्रवार, 05/08/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

'इट अ‍ॅंड रन' : अल्ट्रारनर्सच्या थरारक विश्वाची सफर !

लेखक मारवा यांनी शनिवार, 15/08/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
'इट अ‍ॅंड रन : माय अनलाइकली जर्नी टू अल्ट्रामॅरेथॉन ग्रेटनेस' ही स्कॉट ज्युरेक या असामान्य माणसाची अत्यंत रोचक, विलक्षण अशी जीवनकहाणी आहे. स्कॉट ज्युरेक हा अल्ट्रारनर आहे. अल्ट्रारनिंग म्हणजे जहॉं मॅरेथॉन खत्म होती है, वहॉंसे अल्ट्रारनिंग शुरू होती है. या पुस्तकाअगोदर मलाही मानवी रनिंगची मर्यादा म्हणजे मॅरेथॉन वा फार तर ट्राअ‍ॅथलॉन इतकीच माहीत होती. मागे सकाळमध्ये पुण्याच्या एका तरुण डॉक्टरने ट्राअ‍ॅथलॉनसाठी केलेल्या प्रयत्नांवर एक सुंदर लेख वाचला होता. नुकतेच सुपरमॉडेल मिलिंद सोमणनेही एक ट्राअ‍ॅथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केलीय वयाच्या पन्नासाव्या वर्षी, त्याचीही बातमी ताजीच आहे.