Skip to main content

आंतरराष्ट्रीय

पुणे सायकलिंग 'ग्रँड टूर' म्हणजे नक्की काय? सायकलिंगची 'वारी' ते जागतिक दर्जाचा थरार!

लेखक Avinash Anushe यांनी शनिवार, 24/01/2026 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे सायकलिंग ‘ग्रँड टूर’ : सायकलिंगची वारी की जागतिक दर्जाचा थरार? पुणे आणि सायकल यांचं नातं म्हणजे अगदी मिसळ आणि पाव — एकमेकांशिवाय अपूर्ण! एकेकाळी “सायकलचे शहर” म्हणून ओळखलं जाणारं पुणे आज पुन्हा एकदा त्या ओळखीला नवं, भव्य आणि जागतिक रूप देत आहे. सध्या शहरात एका शब्दाची जोरदार चर्चा आहे — ‘ग्रँड टूर’ (Grand Tour). अनेकांच्या मनात प्रश्न येतोच, “आपण लहानपणापासून सायकल चालवतोय, मग यात एवढं ‘ग्रँड’ काय?” “ही नुसती नवी फॅशन आहे का?” उत्तर आहे — नाही! ही फक्त रविवारी सकाळी दोन पेडल मारण्याची गोष्ट नाही.

रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन

लेखक _मनश्री_ यांनी शनिवार, 10/09/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.

रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......

रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे

1

भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली.

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

लेखक shawshanky यांनी शुक्रवार, 05/08/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 08/12/2015 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला. एबी डिव्हिलर्सने दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिकाराचे नेतृत्व केले.

सायकल समुह

लेखक निनाद यांनी मंगळवार, 01/12/2015 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट्सअ‍ॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे. या समुहामुळे,
  • सायकलप्रेमी एकत्र आणणे,
  • सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
  • दुरुस्तीबद्दल मदत करणे
  • आणि प्रोत्साहन देणे
असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे. तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल. तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे. समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यनि ने पाठवावेत. हा समुह फक्त सायकल या विषायसाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी. आपला (सायकलवाला) निनाद

ओन लाईन गेम

लेखक मम्बाजी सर्वज्ञ यांनी मंगळवार, 27/10/2015 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी ओन लाईन गेम खेळता का? तुम्ही खेळत असलेल्या खेळांची नावे आणि कोणत्या साईट/प्लाटफोर्म वर खेळता ते सांगणार का? मी xbox 360 वर modern warfare 3 खेळतो आणि chess.com वर बुद्धिबळ खेळतो. MW3 साठी क्लान मेम्बर्स शोधतोय, कुणाला इंटरेस्ट असेल तर व्य नि करा.