मडिकेरी ( कूर्ग ) - एक धावती सहल
मडिकेरी - एक धावती सहल
मागच्या महिन्यात कर्नाटकातील चिक्कमगळुरु येथे जाण्याचा योग आला. आता मार्चमध्ये उडुपीला एका समारंभात जायचे होते. त्याला धरून थोडे मडिकेरी फिरून आलो. दोन्ही ठिकाणं कॉफीच्या मळ्यांसाठी नावाजलेली आहेत. ८०० ते १००० मिटर्स उंचीवर डोंगर उतारावर आणि उंच झाडांच्या सावलीत कॉफीची झाडे चांगली वाढतात. पाऊस जास्ती लागतो. त्यासाठी पोषक वातावरण इथे आहे. विशेष म्हणजे कॉफीच्या झाडसाठी डोंगरावरची झाडे कापून टाकावी लागत नाहीत. तसे चहा लागवडीचे नाही. एकूण हा भाग रम्य आहे. आम्ही मंगळुरूला रेल्वेने उतरून बसने मडिकेरीला गेलो. तिथे दोन दिवस राहून परत बसने मंगळुरूमार्गे उडुपीला पोहोचलो. कोस्टल रोड छान मोठा आहे. वाहने वेगात जाऊ शकतात. मंगळुरू ते उडपी ६६ किमतीचे अंतर बसने सवा तासांत कापले. (मागच्या महिन्यात उडुपीला राहून मल्पे बीच पाहिले होते. इकडे मट्टु बीच सहा किमीटरवर, काउप बीच अठरा किलोमीटर अंतरावर आहे. शहरात बरीच हॉटेल्स आहेत. या वेळेस श्रीकृष्ण मठाच्या आवारात राहिलो. )
जाण्याअगोदर यूट्यूबवर काही वाडिओ पाहून घेतले. या साईटवर चांगली माहिती मिळाली.
Thrillophilia ....25 Best Tourist Places in Madikeri यातल्या बऱ्याच ठिकाणांमध्ये आवड नव्हती.
इरप्पू आणि अबी या धबधब्यांना भेट देणे उपयोगाचे नव्हते कारण मार्च महिन्यात पाणी कमी असते.
भागमंडला+तलकावेरी ४३ किमी दूर मडिकेरीच्या पश्चिमेस आहे. याच रस्त्यावर ग्लास ब्रिज आहे.
कुशालनगरा(तिबेटी वस्ती आणि मंदिर), निसर्गधामा (मुलांसाठी बाग), दुबारे ( हत्ती पाहणे) या तीन जागा मडिकेरीच्या पूर्वेला मैसुरू रोडवर साधारण तीस किमी अंतरावर आहेत. राजाज टूम (थडगे समाधी)२ किमी, अबी (कोदवू भाषेत धबधबा)फॉल्स ८ किमी उत्तरेस आहे.
राजाज सीट एक किमी दक्षिणेकडे आहे.
ओंकारेश्वर टेंपल आणि मडिकेरी फोर्ट ( पॅलेस आतमध्येच आहे) हे बस स्टँड पासून तीनशे मिटर्स इतके जवळच आहे. यास लागूनच पोस्ट ऑफिसची इमारत आहे.
का जावे: सुटी घालविण्यासाठी थंड हवेचे धार्मिक नसलेले उंचावरचे ठिकाण म्हणता येईल.
कसे जावे : मंगळूरू येथे रेल्वे किंवा विमानाने गेल्यावर पुढील १४० किमी मडिकेरीला रस्त्यानेच जावे लागते. मंगळूरू - बंटवाल - पुत्तुर - सूल्या - मडिकेरी मार्गे मैसुरू बसेस सतत असतात. सूल्यापासून पंचवीस किमी गेल्यावर नंतरचे पंचवीस किमी घाट चढून ११०० मिटर्स उंचीवर मडिकेरी आहे. रात्रीचे तापमान २३° सेंग्रेडहोते. दिवसा २७°. बेंगळूरू -मैसुरू-मडिकेरी असा २५० किमीटरसचा रस्ता पडतो. म्हणजे तिकडूनही सहल पुरी करता येईल.
राहाणे कुठे :
मडिकेरी बस स्टँड, फोर्ट यांच्या आजुबाजूला बरीच हॉटेल्स आहेत. सभोवार बघितलं तर डोंगर उतारावर अनेक हॉटेल्स दाटीवाटीने उभी दिसतात. शिवाय विविध रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कॉफीमळे (इस्टेटस) आहेत त्यात होम स्टे आहेत. आमचे फिरणे स्थानिक बसेसनेच होत असल्याने शहरातील हॉटेल्स शोधतो.
खाणे :
दूरच्या किंवा इस्टेटमधील होम स्टेमध्ये त्यांचीच खानावळ असते. शहरात पर्याय बरेच असतात. फोर्टासमोरचे शांती सागर वेज हॉटेल चांगले आहे. येथे इडली, वडे, डोसे, भजी चांगली मिळतात परंतू एकूणच उडपी,मंगळूरू , मडिकेरी, चिक्कमगळुरू भागांत मुख्य शाकाहारी जेवणाची वाट लागते. अत्यंत बेचव आमटी भाजी असते. एक डाळीचं पातळ तिखट पाणी, आणखी एक जरा तिखट पाणी आणि भोपळ्याच्या फोडी घातलेलं आणखी एक तिखट पाणी अधिक भात हा प्रकार. भाजी म्हणजे भोपळ्याची मोहरी खोबरं घातलेली बेचव भाजी. कोशिंबीर म्हणजे बीट, कांदा खोबरं मिक्स. एक खिरीची वाटी. पोळी नाही. कुठे असलीच तर जाड रोडगे असतात. पुऱ्या कडक असतात. बाहेर दुकानातून पाव लोणी घ्यावे तर सॅन्डविच ब्रेड आणि अमुल बटर कुठेही मिळत नाही. मडिकेरीत 'कोदवू' लोक राहात होते. त्यांच्या पद्धतीचे खाणे आणि जेवण देणारी हॉटेल्सही बरीच दिसतील. यांचा मुख्य भर पोर्क डिशेस असतो.
फिरणे, मडिकेरीतील भटकंती :
दूर दूरच्या होम स्टेमध्ये राहाणारे (बेंगळुरूहून येणारे) आपल्या कारनेच येतात त्यामुळे फिरण्याचा प्रश्न नसतो. कार, बाईक रेंटल मिळतातच. मुंबई पुण्याकडून येणारे मराठी लोक बरेच दिसले. ते टॅक्सी भाड्याने घेऊन फिरतात. आम्ही एसटीनेच फिरतो. आणि ती वाहन व्यवस्था तिकडे फारच चांगली आहे. बसेस,बस डेपो, आणि त्यातील कॅन्टिनस स्वच्छ आहेत. भरपूर बसेस असतात. मडिकेरी भाग संपूर्ण डोंगराळ आहे. सलग शंभर दोनशे मिटर्सचा सरळ सपाट रस्ता सापडणार नाही. ( चिक्कमंगळुरूत तसे नाही.खूप छान शहर आणि बाजाराचे रस्ते दिसतात.) सतत वळणावळणाचे चढउताराचे घाट आहेत.
सकाळी तलकावेरी , भागमंडला बसने जाऊन पाहून आलो. पावसाळ्यात इथे जाणे योग्य. आता पाणी नव्हते. ( कन्नडा भाषेत 'तले' म्हणजे माथा) भागमंडला येथे भगंडेश्वराचे देऊळ आहे आणि दोन नद्यांचा संगम आहे.
आम्ही शहरातीलच फोर्ट, ओंकारेश्वर आणि राजाज सीट पायी फिरत पाहिले. राजाज सीट ही छोटीशी बाग सर्वात चांगली जागा आहे. फुले भरपूर. शिवाय रोपवे आणि रॉकेट झोपाळा तरुणांना नक्की आवडेल. छोटी टॉय ट्रेन बंद होती. सकाळ संध्याकाळी वेळ घालवायला उत्तम.
इतर माहिती :
वर दिलेल्या साईटवर चांगली माहिती दिलेली आहे. गाईडची गरज नाही. 'कॉफी इस्टेट टुअर' हवी का म्हणून कुणी विचारतात. त्यात बाग आणि मसाल्याची झाडे दाखवतात. आपण प्रवास करतानाच वाटेत दोन्ही बाजूस रबर, कॉफी,वेलदोडे, नारळ, ताड, सुपारी, फणस, यांची गच्च झाडी दिसतच राहाते. मडिकेरी हे कोदावू लोकांचे वसतीस्थान. ब्रिटिशांनी कूर्ग नाव ठेवले होते त्याला आता कोडगू म्हणतात. मरकेरा या नावाचे मडिकेरी झाले आहे. हॉकी खेळाचे बरेच खेळाडू इथले असत. सैन्यात जाणारे लोकही फार असत. ती माहिती इतरत्र मिळेलच. चार दिवस रेंगाळण्यासाठी मडिकेरी छान आहे.
मनोरंजन करण्यास भरपूर वाव आहे, फक्त वेळ आणि पैसे हवेत.
फोटो १
राजाज सीट जाण्याचा मार्ग रूट
फोटो २
तलकावेरीकडे ,४३ किमी
फोटो ३
मसाल्याची दुकाने
फोटो ४
ओंकारेश्वर वरून
फोटो ५
ओंकारेश्वर तलाव.
फोटो ६
राजाज सीट. इथे राजा बसून सूर्यास्त पाहात असे.
फोटो ७
राजाज सीट बागेतून दिसणारे दृष्य.
फोटो ८
वेलीची कमान, राजाज सीट बाग.
फोटो ९
कोटे महागणपती मंदिर, मडिकेरी किल्ला.
फोटो १०
मडिकेरी किल्ल्यातील राजाचा महाल. रंगकमामुळे आतून पाहता आला नाही. खूप मोठा आहे.
फोटो ११
मडिकेरी फोर्ट मधील दोन हत्ती पुतळे.
फोटो १२
किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा मडिकेरी शहराचा भाग.
फोटो १३
तलकावेरी प्रवेशद्वार. मोठी वाहने, बसेस इथे थांबतात. येथून फक्त पाच मिनिटांवर कावेरी उगम मंदिर आहे. लहान वाहने अगदी पुढे जाऊ शकतात.
फोटो १४
प्रवेशद्वार, मडिकेरी फोर्ट.
फोटो १५
माहिती पाटी.
फोटो १६
या वेलीची फुले मडिकेरीमध्ये जागोजागी दिसतात.
फोटो १७
बेगम बहार नावाची झुडपे राजाज सीट बागेची शोभा वाढवतात.
फोटो १८
हत्ती पुतळा, राजाज सीट पार्क.
फोटो १९
फक्त दोन फुटी उंचीचे कॉफीचे झाड, फुलांचा बहर. पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले
फोटो २०
उडुपी कृष्ण मंदिर आवारातील विद्यावरिधिनी तीर्थ गेस्ट हाऊस इमारतीच्या रुममधून दिसणारे दृष्य. समोरच्या रस्त्याला कार स्ट्रीट म्हणतात. येथे कृष्णाची एक मूर्ती रोज वाजत गाजत फिरवतात.कौलारू मंदिर चंद्रमौलिश्वराचे. मागचा घुमट रथाचा आहे. गोपूर कृष्ण मंदिराचे आहे.
उडुपी श्रीकृष्ण मंदिराच्या आवारात रथमार्गावर संध्याकाळी श्री कृष्णाची मिरवणूक निघते. Video link https://youtu.be/xDY-hEua0DI ____________________________________

वाचने
8733
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मी पयला!!
In reply to मी पयला!! by राजेंद्र मेहेंदळे
ट्रुरिस्ट कारवाले त्यांच्या
मस्तच!बेगम बहार पहिल्यांदा
मस्त भटकंती!
सुंदर माहितीपूर्ण लेख
मस्त एकदम. फोटो आणि नेमके आणि
In reply to मस्त एकदम. फोटो आणि नेमके आणि by प्रचेतस
कर्नाटक टुरिझम चे मयुरा व्हॅली व्ह्यू
छान !
व्वा सुंदर भटकंती आणि प्रचि !
माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः,
In reply to माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, by कांदा लिंबू
बेंगलोरच्या आसपास आणि परत
In reply to माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, by कांदा लिंबू
तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन
In reply to माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, by कांदा लिंबू
लहान मुलांसाठी 'activity'
In reply to माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, by कांदा लिंबू
अर्धवट लिहिल्याबद्दल क्षमस्व _/\_
In reply to अर्धवट लिहिल्याबद्दल क्षमस्व _/\_ by कांदा लिंबू
' Not in office ' channel चे
In reply to ' Not in office ' channel चे by कंजूस
सुरेख
In reply to सुरेख by चौथा कोनाडा
बरेचदा असं होतं की हवे असलेले
अरे वा. छान भटकंती करत आहात.
In reply to अरे वा. छान भटकंती करत आहात. by चित्रगुप्त
प्रवास - एकटाच करतो किंवा
In reply to प्रवास - एकटाच करतो किंवा by कंजूस
त्यात ऐनवेळी चर्चा किंवा फाटे
In reply to प्रवास - एकटाच करतो किंवा by कंजूस
एकट्याने फिरणे सर्वात उत्तम.
In reply to एकट्याने फिरणे सर्वात उत्तम. by चित्रगुप्त
ते वाळलेले दोडके स्नान करताना
In reply to ते वाळलेले दोडके स्नान करताना by गवि
गिलकेच.
In reply to एकट्याने फिरणे सर्वात उत्तम. by चित्रगुप्त
अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि
In reply to अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि by कंजूस
अमेरिकेतील कँपिंगची मजा काही औरच असते.
In reply to अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि by कंजूस
तंबू लावून राहण्याचे स्वप्न येत्या सप्टेंबरात पूरे करूया.
परिवर्तन पसंद नही. हाहाहा